सणसवाडीतील कंपनीतून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीतून खिडकीचे गज उचकटून कंपनीतील सेन्सर सह कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

सणसवाडी (ता. येथील) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय शेजारील व्हीक्टोरा प्रायवेट लिमिटेड कंपनीतील सर्व कामगार सुट्टीमुळे गावाला गेलेले होते, तर फक्त कंपनीचे सुरक्षारक्षक कामोनिमध्ये होते. त्यानंतर कंपनीचे कामगार कंपनीत आले असत कंपनीतील स्टोअर रुमच्या दरवाजा आणि खिडकी उचकटून कंपनीतील साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान पाहणी केली असता कंपनीतील महागडे सेन्सर तसेच कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत मनोज गुलाबचंद पांडे (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गोडसरा ता. घोसी जि. मऊ उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.