शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला असुन पेट्रोलिंग व तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या चौकशीत शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिसांनी आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडुन ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरात दाट लोकवस्ती असून दुचाकी वाहनांचीही […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दुचाकीचोर; चार चोरीच्या मोटारसायकली जप्त

शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मनोज युवराज टेमगिरे (रा. बुरूजवाडी, […]

अधिक वाचा..