कायमस्वरूपी तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे उपाय नक्की करा…

कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर… 1) रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 9.30 ते 10.00 ला झोपणे. 2) सकाळी 5.00 -5.30 अगदी उशिरा 6 बाजता किंवा त्याच्या आत उठणे. 3) ब्रश करायच्या आधी एक ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4) 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5) कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत; प्रियंका गांधी 

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस […]

अधिक वाचा..

धक्कादायक; पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे सेल्फीसाठी तरुणाईचा जीवघेणा स्टंट

लोणावळा (प्रतिनिधी) आज (दि १५) रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे अनेक तरुण वेगात स्पोर्ट बाईक चालवत आहेत. तर काही तरुण चारचाकी गाडीत बसुन खिडकीच्या काचा उघडत सेल्फीसाठी जीवघेणा स्टंट करत आहेत. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. लोणावळा परिसरात काही दिवसांपुर्वी पर्यटनासाठी […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमधील ‘त्या’ युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) रा. बाबुरावनगर शिरुर, मुळ (रा. विसापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या युवकाला एका महीलेच्या नवऱ्याने प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन मित्रांच्या मदतीने मारहाण करुन दमदाटी केल्याने त्याच नैराश्यातुन विशाल शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह इतर २ ते ३ अनोळखी इसमांविरुध्द शिरुर […]

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..

देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे; चंद्रकांत दादा पाटील

मुंबई: भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एच. एस. एन. सी. विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे किशीनचंद्र […]

अधिक वाचा..

लोखंडी फायटरने तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): एका तरुणाला जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शिरुर येथे बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे सर्वजण (रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची […]

अधिक वाचा..

शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील

मुंबई: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरात स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी ठेवून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने याबाबत रेहान असिफ काझी या युवकांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान असिफ काझी व इतर चार इतर अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट व स्टोरी […]

अधिक वाचा..