छ. संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिरासमोर कारने ५-६ जणांना चिरडले, एक जण जागीच ठार

इतर क्राईम महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ ते ६ जणांना चिरडण्यात आले, त्यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर चार जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेचा तपशील

गारखेडा येथील क्रीडा संकुलातून टेनिस खेळून परतणाऱ्या प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको) याने MH-20-HH-0746 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने काळा गणपती मंदिराजवळ निष्काळजीपणे व भरधाव वेगात वळण घेतले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांवर गाडी घातली.

गंभीर परिणाम

या धक्कादायक अपघातात मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) हे जागीच मृत्युमुखी पडले.

इतर जखमी

मनीषा विकास समधाने (वय ४०)

विकास समधाने (वय ५०) — दोघांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू

रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५)

श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) — दोघांवर मिनी घाटीत प्राथमिक उपचारानंतर इतर रुग्णालयात हलवण्यात येत आहे.