चौलमध्ये आशापुरी–हिंगुळजा मंदिर वाद पेटला; वनजमिनीवरील अतिक्रमणाचा आरोप

रायगड: रायगड जिल्ह्यातील चौल येथे आशापुरी देवी व हिंगुळजा देवी मंदिर परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व मंदिराच्या नामांतराचा आरोप स्थानिक रामवंशी क्षत्रिय समाजाने केला आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नेमका वाद काय? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशापुरी देवी व हिंगुळजा देवी या पारंपरिक दैवतांचे […]

अधिक वाचा..

महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मंदिर परिसरात डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर येथे राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी […]

अधिक वाचा..

महाशिवरात्रीला शिवलिंगाचा असा करा अभिषेक, आणि मंदिरातून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा

येत्या रविवारी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शिव प्रथमच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर विशेष अभिषेक करण्याचे महत्त्व आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होतात, […]

अधिक वाचा..

‘हे केवळ मंदिर नाही, तर विश्वशांतीचे प्रतीक’; एकनाथ शिंदे

त्रिमंदिरातून विश्वशांतीचा संदेश; ठाण्यात धार्मिक एकतेचा नवा अध्याय सुरू ठाणे: धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या, अहिंसेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, असा संदेश देणाऱ्या ठाण्यातील भव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने शहरात धार्मिक एकतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिरासमोर कारने ५-६ जणांना चिरडले, एक जण जागीच ठार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडले मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ ते ६ जणांना चिरडण्यात आले, त्यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर चार जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे […]

अधिक वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संविधान हाती घेऊन सहकाऱ्यांसह ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश

समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना नाशिक: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन […]

अधिक वाचा..

नीलम गोऱ्हेच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरातील मंदिरात ड्रेसकोड लागू होणार?

संभाजीनगर: मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे न घालता, मंदिरांमध्ये प्रवेश करताना पेहराव योग्य असावा, अशी मागणी समोर येत आहे. काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना आपल्या संस्कृतीला शोभेल असा पेहराव परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत असून राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील […]

अधिक वाचा..

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सोमवार (दि 8) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिर पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढे […]

अधिक वाचा..

रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रथमच कामगार दिनानिमित्त मंदिरातल्या सर्व कामगारांचा सन्मान 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असुन सोमवार (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त प्रथमच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या संकल्पनेतून तसेच देवस्थान ट्रस्टचे खजिनदार विजय देव यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात […]

अधिक वाचा..