शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 8 दरम्यान सुप्रसिद्ध प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन पिंपळगाव पिसा ग्रामस्थांसह पंचंक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक संदीप पंदरकर यांनी केले आहे.
पिपंळगाव पिसा या गावची रेणुकामाता यात्रा दि 23 मे 2024 रोजी असुन यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि 25 रोजी महाराष्ट्रातील प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.