दोन वर्षानंतर कान्होराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

इतर शिरूर तालुका

प्रदीर्घ काळाने पालखीचे आगमन झाल्याने ग्रामस्थ आनंदित

शिक्रापूर: गेली काही दिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष आपल्या विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना काहीशी उसंत यावेळी मिळालेली असून अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असताना येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

केंदुर (ता. शिरुर) येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखीचे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयोजन करण्यात आले, लांबलेला पाऊस आणि त्या चिंतेत असलेला शेतकरी वर्ग, कोरोनामुळे दोन वर्ष विठ्ठलाची न झालेली भेट यामुळे वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे शिवशंभो मित्र मंडळाचे कैलासराव थिटे, हरिश्चंद्र थिटे, बाबुराव थिटे, विशाल थिटे यांनी सांगितले. तर केंदुर ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याचे आगमन नुकतेच थिटेवाडी येथे झाले. दरम्यान दरवर्षीच्या वारी पेक्षा यावर्षी वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असल्याचे दिंडी नंबर एकचे दिंडी चालक उल्हास थिटे यांनी यावेळी सांगितले.

केंदूर सह परिसरातील पाबळ, कनेरसर, गोसासी, दावडी, शेल पिंपळगाव, वडगाव घेनंद मार्गे आळंदी अशी श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. थिटेवाडी ग्रामस्थांनी या पालखीचे स्वागत केले. याप्रसंगी आयकर विभागाचे अधिकारी प्रशांत गाडेकर, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, पुणे जिल्हा दुग्ध उत्पादन संघाच्या अध्यक्षा केशर पवार, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, केंदुरचे सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता थिटे, चंद्रशेखर शिर्के, माजी मुख्याध्यापक तानाजी थिटे, बाजीराव थिटे, बाळकृष्ण थिटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे, प्रशांत थिटे, शिवशंभो मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप थिटे, गोरक्ष थिटे, कांताराम थिटे, रोहन थिटे, अविनाश थिटे, रामदास वाजे, योगेश खर्डे, तेजस थिटे, भास्कर थिटे, दिपकराव थिटे, ज्ञानेश्वर थिटे,भरतराव थिटे, माजी केंद्र प्रमुख रंगनाथ थिटे यांसह आदी उपस्थित होते.