Shirur Police Station

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून एकाला लोखंडी रॉडने हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रेय वसंत लंके (वय 35 रा. शिरूर, मूळ रा. निघोज ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. किसन जयवंत नरवडे (रा. कुरूंद, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दुपारी १:१५ वाजता सुमारास शिरूर येथील नवीन कांदा मार्केट येथील घावटे कॉम्पलेक्समधील जिन्यामध्ये किसन जयवंत नरवडे याने त्याचे वाहन कर्जाचा पायल सर्व्हिस सेंटरसोबत झालेल्या व्यवहाराचा राग मनात धरून फिर्यादी दत्तात्रेय लंके याला लोखंडी रॉड व हाताने मारहाण करून, शिवीगाळ करून डाव्या हाताच्या करंगळीस गंभीर दुखापत केली आहे.

याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहे.

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…