शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीत गावठाण हद्दीतील गट क्रं १ मध्ये तसेच गावात चारही बाजुने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरु असुन सत्ताधारी मंडळी याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करत आहेत. तर गाव कामगार तलाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे तातडीने हे अतिक्रमण थांबविण्यात यावे अशी मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे.
शिरुर-काष्टी रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी असणारे निमोणे हे महत्वाचे गाव आहे. या गावात भारतीय स्टेट बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, महावितरणचे सबस्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्कल ऑफिस असुन या ठिकाणी दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या गावची लोकसंख्या अंदाजे सात हजाराच्या आसपास आहे. परंतु सध्या गावाच्या चारही बाजुने मोठया प्रमाणात अतिक्रमण सुरु असुन सत्ताधारी मंडळी याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर प्रशासनातील अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
गावाच्या चारही बाजुने अतिक्रमणाचा विळखा…
निमोणे गावच्या चारही बाजुने मोठया प्रमाणात अतिक्रमण सुरु असुन निमोणे-पिंपळाची वाडी रस्त्यावर गट क्रं १ मध्ये पाझर तलाव असुन त्या पाझर तलावाच्या सांडीच्या बाजुने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डबर टाकुन त्यावर मुरुम टाकला आहे. परंतु एवढे होऊनही ग्रामपंचायत मधील सत्ताधाऱ्यांनी याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे काही जागरुक नागरिकांनी हे अतिक्रमण थांबवावे अशी मागणी केली आहे.
याबाबत निमोणे येथील ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने मी काहीही कारवाई करु शकत नाही. याबाबत तलाठी राजेंद्र जाधव यांना संपर्क साधला असता, सध्या मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत त्यांनी कारवाई करण्याबाबत उत्तर देण्याचे टाळले.
(क्रमश:)
शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई