मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सच्या सभांचा धडका सुरू आहे. मात्र अशातच काल छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी थेट इशाराच महायुती सरकारला दिला आहे. हे राज्यही आमचे येथील लोकंही आमची आणि इथे आवाजही आमचाच… जय महाराष्ट्र अशी गर्जनाच जयंत पाटील यांनी केली आहे.