शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांतून एक नवी दृष्टी निर्माण करण्यात आली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या हस्ते पूजन करत यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख रूपसिंग मल्लाव, सिमा पाटील यांच्या नियोजनातून आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेतला, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषण ही एक कला असून त्या कलेवर कशाप्रकारे प्रभुत्व मिळवता येईल यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे.
याविषयीचे अतिशय समर्पक असे दाखले देत, हास्य शैलीमधून एका विषयातून दुसऱ्या विषयात लीलया प्रवेश करत लोकमान्य टिळकांचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवत, लोकमान्य टिळकांच्या कार्याचा वसा आणि वारसा आपणाला पुढे चालवायचा असेल तर त्यांचे आदर्श आपण आपल्यामध्ये उतरवले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता लिमगुडे यांनी केले तर प्रास्ताविक रुपाली नागवडे यांनी केले आणि मनोज धिवार यांनी आभार मानले.