शिरुर तालुक्यात सरपंचांवर राजीनाम्यासाठी दबाव सत्र

राजकीय

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच अनुसिचीत जाती जमातीचे आरक्षण सरपंच पदासाठी जाहीर झाले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली असताना आता सध्या सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने राज्यातील राजकारणानंतर आता गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

शिक्रापूर (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील सर्वात महत्वाचे समजले जाणारे गाव या गावची ग्रामपंचायत निवडणूक पार पडत असताना अनेक घडामोडी घडल्या यावेळी सरपंच पद अनुसूचित जाती जमाती साठी आरक्षित करण्यात आले. यावेळी दोन गटात निवडणुका पार पडत असताना सतरा मध्ये फक्त एकच जागा अनुसूचित जाती जमाती साठी आरक्षित करण्यात आलेली असल्याने या जागेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र २ गटात स्वतंत्र २ पॅनल मध्ये निवडणुका पार पडल्यानंतर एका गटाला ८ तर एका गटाला सात जागा मिळाल्या.

परंतु बहुमत नसलेल्या गटाकडे सरपंच पद गेले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली. मात्र सदर अनुसूचित जाती जमातीतील समाजाचे प्रतिनिधित्व करणारे काही स्थानिक पुढारी सरपंच रमेश गडदे यांनी राजीनामा द्यावा, असा दाबत टाकत आहे, तर निवडणूक होण्यापूर्वी सदर जागा लढविण्यासाठी चार जन इच्छुक होते कोणीही माघार घेत असल्याने आम्ही प्रत्येकाला सव्वा वर्षे संधी देऊ असे ठरले होते. त्यामुळे सरपंच रमेश गडदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अनुसूचित जाती जमातीतील समाजाचे नेते प्रकाश आबुराव सोंडे यांनी केली आहे.

मला सरपंच पदावरुन राजीनामा द्या असा दबाव टाकला जात आहे. मात्र राजीनामा कोणत्याही परिस्थितीत द्यायचा नाही असे आमच्या पॅनल प्रमुखांचे म्हणणे आहे. मात्र राजीनामा द्याच असा दबाव टाकत आहे. त्यामुळे माझी दुहेरी मनस्थिती झालेली असून पॅनल प्रमुख व राजीनामासाठी दबाव टाकत असलेल्या समाज बांधवानी एकत्र बसून चर्चा करावी असे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले आहे.

विरोधी गटामध्ये देखील हालचालींना वेग…
शिक्रापूरचे सरपंच रमेश यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्या विरोधी गटातील देखील काही सदस्यांनी वेगवेगळ्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे सरपंच रमेश गडदे यांचा राजीनामा नेमका समाज बांधवांना हवा आहे कि विरोधी गटाला अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र यामध्ये काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.