हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय, ॲनिमियाचा त्रासही कमी होईल

आरोग्य

दररोज एक आवळा नियमितपणे खा. मोरावळा, मुरंबा असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता. आवळा हा शरीरातील लोह वाढविण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे.

दुसरे म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी कढई, लोखंडी तवा अशा वस्तूंचा वापर करा.

डाळिंब, बीट, पालक, मनुका, गूळ- शेंगदाणे असणारे पदार्थ नियमितपणे खा आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा- कॉफी पिऊ नका. कारण चहा- कॉफी प्यायली तर आहारातून मिळणारे लोह चहा- कॉफीमध्ये असणाऱ्या टॅनिन आणि कॅफिनमुळे शरीरात शोषले जात नाहीत.

नियमितपणे व्यायाम करा. योगासनं करा, स्वच्छ सुर्यप्रकाशात फिरायला जा. असे केल्याने आहारातील लोह शरीरात जास्तीतजास्त प्रमाणात शोषून घेण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)