संभाजीनगर: तुमच्या मुलांसाठी योग्य शाळा निवडताना योग्य शिक्षण मंडळ निवडणे ही एक थोडी अवघड प्रक्रिया आहे. पण SSC, CBSE, ICSE मध्ये काय फरक आहे. तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी योग्य बोर्ड कोणत. प्रत्येक मंडळाच्या त्रुटी आणि सकारात्मक गोष्टी काय आहेत. हे आम्ही तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
SSC, CBSE आणि ICSE बोर्ड म्हणजे काय
खूप लोकांना वाटतं हे तिन्ही सारखेच आहेत, पण हे गैरसमज आहे
SSC: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (राज्य मंडळ)
CBSE: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
ICSE: इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन
SSC – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
राज्य मंडळाकडून घेतली जाणारी परीक्षा
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये SSC लागू आहे
इंग्लंडच्या GCSE प्रमाणेच SSC ही 10वीनंतर घेतली जाते
SSC अभ्यासक्रमात काय असत
स्थानिक राज्यभाषेवर भर
राज्य-केंद्रित अभ्यासक्रम
अतिरिक्त उपक्रमांची मर्यादा
IIT/NEET साठी वेगळं कोचिंग घ्यावं लागतं
CBSE – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
संपूर्ण भारतात एकसारखा अभ्यासक्रम
NCERT कडून अभ्यासक्रम आखला जातो
दहावी व बारावी – दोन्ही बोर्ड परीक्षा घेतल्या जातात
भारतात जास्त प्रमाणात शाळा CBSEशी संलग्न आहेत
CBSE अभ्यासक्रमात काय असत
संक्षिप्त पण गुणात्मक अभ्यासक्रम
शाळा बदलणे सोपे
स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी
मूलांचा सर्वांगीण विकास
कोणतंही करिअर निवडताना अडचण नाही
ICSE – इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन
सखोल आणि व्यापक शिक्षण प्रणाली
10वी – ICSE आणि 12वी – ISC
भाषा, साहित्य, विज्ञान, गणित यावर विशेष भर
परदेशी शिक्षणासाठी उत्कृष्ट पर्याय
ICSE अभ्यासक्रमात काय असत
प्रत्येक संकल्पनेचा सखोल अभ्यास
वाचन, लेखन, बोलणे, मार्गदर्शन यावर भर
बौद्धिक विकासास प्रोत्साहन
मुलांना ग्लोबल एक्स्पोजर
परदेशी युनिव्हर्सिटीसाठी अधिक अनुकूल
तर, कोणता बोर्ड निवडायचा
याचं उत्तर आहे – मुलाच्या आवडी आणि भविष्यातील उद्दिष्टांनुसार
SSC, CBSE, ICSE – तिन्हींचे फायदे आणि तोटे आहेत