कायम शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू; दीपक केसरकर

मुंबई: कायम शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील पात्र तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अनुदान पात्र अघोषित शाळांना 20 टक्के व यापूर्वी 20 अथवा 40 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून 61 हजार शिक्षकांना मूळ प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील पांडुरंग विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत 

शिरुर (तेजस फडके): रुबाबदार फेट्यांचा झोक… मिरवणूकीला ढोल ताशांची साथ… कुंकूम तिलकाने प्रेमाचे औक्षण… नवीन पुस्तके…गोड खाऊ आणि एक फुल झाड सुद्धा…! हा थाट आहे नवागतांच्या स्वागताचा…! विठ्ठलवाडी (ता.शिरूर ) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे असे जोरदार स्वागत केले. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा नुकताच आरंभ झाला प्रदिर्घ […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले 

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी मराठी शाळेला कमी न लेखता,अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच शिक्षकांनीही प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण द्यावे. आज (दि 15) या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असुन सर्वच विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे आणि खुप अभ्यास […]

अधिक वाचा..

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट…

तुमची मुलं बोगस शाळेत तर शिकत नाही ना..? औरंगाबाद: अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळा सुरू करणे, नियम आणि अटींची पूर्तता न करताच एडमिशन करणे, दुसऱ्या शाळांच्या यूआयडी क्रमांकावर विद्यार्थ्यांची एडमिशन असेल, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम भासवून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणे. असे अनेक प्रकार सर्रासपणे […]

अधिक वाचा..

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरु होणार

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर […]

अधिक वाचा..

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

शिक्रापूर (शेरखान शेख): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे. समाजातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये व उच्च शिक्षणाच्या बदलत्या […]

अधिक वाचा..

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

मुंबई: विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य […]

अधिक वाचा..

शाळांना यंदा ४१ दिवसांची उन्हाळा सुटी! उन्हामुळे आजपासून शाळांची वेळ बदलणार…

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात (साडेसात ते साडेअकरा) भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो. आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करणार

मुंबई: भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण तसेच […]

अधिक वाचा..