शिंदोडी (तेजस फडके) ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ या म्हणीप्रमाणे यंदा वरुनराजाने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत दमदार आगमन केल. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी येथील कोरडा पडलेला पाझर तलाव अनेक दशकानंतर मे महिन्यातील वळवाच्या पहिल्याच पावसात ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मोटेवाडीसह चव्हाणवाडी, लंघेवाडी, दुर्गेवस्ती येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावर्षी महाराष्ट्रात लवकरच मे महिन्यातच वरुनराजाने हजेरी लावली. काही अपवाद वगळता जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात पाऊसाचे दमदार आगमन झाले. शिरुर तालुक्यातही पाच ते सहा दिवस पाऊसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले, विहिरी, पाझर तलाव हे तुडुंब भरुन वाहू लागले. मोटेवाडी येथील पाझर तलाव या पाऊसाने १०० टक्के भरला. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
यापुर्वी अनेक वर्षात हा पाझर तलाव मे महिन्यात कधीच पुर्ण क्षमतेने भरला न्हवता. गेल्या १०० वर्षात कधीच हा तलाव मे महिन्यात पुर्ण क्षमतेने भरल्याचे आम्हाला आठवत नाही. या पाऊसामुळे आम्हाला खुप मोठा फायदा झाला आहे. पाझर तलाव आटल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या पाऊसामुळे तात्पुरता का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.
दौलतराव येलभार
जेष्ठ नागरिक, मोटेवाडी
शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या
रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना