nitin-thorat

शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वैयक्तिक मतदार संघ ‘ब’ वर्गाच्या रिंगणात नितीन थोरात!

शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित शिरूर यांच्या संचालक मंडळ पंचवार्षिक २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवडणूक होत आहे. मतदान रविवारी (ता. ९) सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत शिरूर येथे होणार आहे. आमदाबाद येथील नितीन अर्जुन थोरात हे निवडणूक लढवत असून, बॅट ही त्यांची निशाणी आहे. बॅट या चित्रावर निशाणीचा शिक्का मारून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन नितीन थोरात यांनी केले आहे.

शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित यांच्या संचालक मंडळ पंचवार्षिक सण २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधी साठी निवडणूक होत आहे. वैयक्तिक सभासद मतदार संघ ‘ब’ वर्गातून ते निवडणूक लढवत आहेत. नितीन थोरात यांनी एटीडी आणि जीडी आर्ट हे शिक्षण घेतले. पण, नोकरी न करता काळ्या आईची सेवा करण्याचे त्यांनी बालवयातच ठरवले. काळ्या आईची सेवा करत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे विविध प्रश्न जाणवू लागल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गाव ते राजधानीपर्यंत त्यांनी मजल मारली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली.

nitin-thorat-award

नितीन थोरात यांनी शेतीमध्येविविध बदल करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेतली असून, त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
– रुपाली चाकणकर यांच्या हस्ते २००३मध्ये राजर्षी शाहु प्रतिष्ठानचा आदर्श शेतकरी पुरस्कार
– किसान नंबर १ हा पुरस्कार महिंद्रा कंपनीतर्फे २०१४ मध्ये समृद्धी सन्मान पुरस्कार प्राप्त
– महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – २०२१
– पुणे जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

नितीन थोरात यांनी अल्पशा परिचयामध्ये म्हटले आहे की…
नमस्कार,
मी थोरात नितीन अर्जुन रा. आमदाबाद ता शिरूर जि पुणे संपर्क-८३२९७७४७७३ प्राथमिक शिक्षण आमदाबाद या गावी झाले.
माध्यमिक शिक्षणासाठी सन १९८६ पासूनच शिरूर शहरात वास्तव्य असल्याने लहान पणापासूनच शेतकरी आणि त्याच्या जिवन व्यथा जवळून पाहत आलो. शिरूर तालुक्याच्या भौगोलिक, सामाजिक, औधोगिक, सहकार व राजकीय बदलांची बदलत गेलेली स्थिती जवळून पाहत आलो.

शिरूर तालुक्याच्या विकासासाठी जे जे नेतृत्व करणारे यांना पाहत आलो. नेतृत्वासाठी पक्षीय राजकारणात नेहमीच अनेकांना निराश होताना पहिले. मात्र हातात सत्तेची दोरी आल्यावर आपल्यासाठी झिजणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ही दिसेले. या व्यवस्थेच्या चक्रव्यहाला भेदण्याकरिता जे सोबत आले नाहीत त्यांच्या शिवाय गावाचा विकास, शेतकरी, कामगार, या घटकांना न्याय मिळवून देण्याच्या साठी…

आमदाबाद गावात सन २००३ मध्ये पांडुरंग आण्णा थोरात वि.का.से.सह.संस्थेची मुख्य प्रवर्तक चेअरमन म्हणून स्थापना केली. सन १९९७ साली आमदाबाद गावात श्री चक्रधर स्वामी ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना करून सहकार्यांच्या मदतीने

सन २००१ मध्ये याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात श्री. पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालय सुरू झाले. परिसरात
एक उपक्रमशील शाळा म्हणून या विद्यालयाचा नाव लौकिक आहे.

शेतमालाला हमीभाव मिळावा, उत्पादित मालाला खर्चाच्या किमान दीडपट (C२+५०) हमीभाव असावा म्हणून १ जून २०१७ चा संपूर्ण राज्यात पुणतांबा येथून सुरु झालेल्या आंदोलनातील एक सदस्य म्हणून काम केले. शेतकऱ्यांना नको असलेले ३ कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे ४०० दिवस सुरु राहिलेल्या आंदोलनात राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने अनेक दिवस या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्या आंदोलनाचे नेते श्री. राकेश टिकेत यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात चळवळ उभी करण्यासाठी सक्रिय राहिलो.

राजकारणात कोण्या एका व्यक्तीची, मनमानी झाली तर समाजाला अनेक तोटे होतात याची सहकारात अनेक उदाहरणे आहेत. आपण मतदार आहात लोभ, प्रलोभनाशिवाय आपण आपला मतदानाचा हक्क बजावल्या शिवाय ‘शेतकऱ्याच्या मिरचीच्याही देठाला हात लावू नये’ या कल्पनेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी मी महाराजांचा एक मावळा आपणास सेवेची संधी देण्याची विनंती करत आहे.
आपला कृपाभिलाशी!
नितीन अर्जुन थोरात.

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!