शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर लैंगिक आत्याचाराच्या घटना वाढत असुन तुळजापूर येथुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असुन त्यानंतर हि गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथुन एक ४० वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नी व मुलीसह रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त आला होता. काही दिवसांपुर्वी पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेली असताना या नराधम बापाने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळेस मुलीने आईला हि गोष्ट सांगितली. परंतु सदर आरोपीने हा प्रकार जर कोणाला सांगितला तर दोघींनाही जिवे मारुन टाकील अशी धमकी दिली.
परंतु आईने धाडस करुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी तातडीने त्या नराधम बापाला अटक करत बेड्या ठोकल्या. त्याला आज (दि १३) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत
आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?
शिरुर; लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार ; पीडित तरुणीची रांजणगाव पोलिसांकडे तक्रार