शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे (ता. शिरुर) येथे (दि ८) जुन रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी निमोणे ग्रामस्थांसह अनेक नातेवाईकांनी थोरात कुटुंबीयांना धीर दिला.
तसेच निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी या कुटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. गावातील अनेक नागरिकांनी याला प्रतिसाद देत संवेदनशीलता दाखवत ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात सुमारे १ लाख ३२ हजार ६४० रु एवढी आर्थिक मदत करत माणुसकी दाखवली.
दशक्रिया विधीच्या वेळेस “तुमची आम्हाला जी साथ लाभली, ती आम्हाला आयुष्यभर सावरण्यासाठी बळ देईल.” अशा भावनिक शब्दांत मयत बाळासाहेब थोरात यांची दोन्ही मुले चेतन थोरात आणि शुभम थोरात तसेच पोपळघट कुटुंब यांनी निमोणे ग्रामस्थ तसेच नातेवाईक यांचे आभार मानले. तसेच थोरात कुटुंबाने या मदतनिधीचा योग्य आणि गरजेपुरताच उपयोग केला जाईल याचीही ग्वाही दिली.
करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार
शिरूर शहरात मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा उलगडा
शिरूर तहसिल कार्यालयात महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद