कारेगाव (तेजस फडके) खेड तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवका विरोधात रांजणगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. हि घटना सन २०२२ ते फेब्रुवारी सन २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत एका पिडीत महिलेने रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रफुलकुमार राजाभाऊ भडके (वय ३०, रा. माताजीनगर, पोस्टल कॉलनी, लातूर) याने पिडीत युवतीला तुझ्याशी लग्न करतो असे सांगुन कारेगाव, खेड, कामशेत, वडगाव जांभुळ अशा विविध ठिकाणी एकत्र राहुन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला.
पिडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊत तिचा मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने अखेर नाईलाजास्तव तिने पोलिसांकडे धाव घेतली. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
कारेगावमध्ये गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?