शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुरच्या पश्चिम भागातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरुन जवळच असणाऱ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाजातील महिलेची छेड काढली. त्यानंतर सदर ठिकाणावरुन गावातील एका राजकीय पदाधिकारी महिलेने ११२ ला कॉल करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला.

परंतु या शिक्षकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्या पिडीत महिलेच्या कुटुंबाला त्या शिक्षकांच्या नातेवाईकांनी ‘आमच्या विरोधात तक्रार कराल तर तुम्हाला गावात राहून देणार नाही.’ अशी धमकी दिल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

खात्रीलायक सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक काही खाजगी कामानिमित्त पिडीत महिलेच्या घरी गेला होता. घरी गेल्यावर त्याने त्या महिलेला ‘घरी कोणी आहे का…?’ अशी विचारपुस केली. महिलेने घरी कोणीच नसल्याचे सांगितल्यावर त्याने घरात प्रवेश करत त्या पिडीत महिलेचा हात पकडत तिची छेड काढली.

या सर्व प्रकाराने ती महिला घाबरल्याने तिने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यानंतर या शिक्षकानेही घाबरुन पळ काढला. त्यानंतर गावातील एका राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलेने डायल ११२ ला कॉल करुन घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर शिक्रापुर पोलिसांनी सदर शिक्षकाला पोलिस स्टेशनला बोलावुन घेत त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र या शिक्षकाच्या विरोधात ती आदिवासी समाजातील महिला तक्रार द्यायला पुढे न आल्याने तिच्यावर या शिक्षकाने गावातील राजकीय पुढारी तसेच त्याच्या नातेवाईकांकडुनच दबाव आणल्याची खात्रीलायक सुत्रांकडुन माहिती मिळाली आहे.

सध्या हे प्रकरण दाबण्यासाठी या शिक्षकाने प्रयत्न चालवले असल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा रंगली आहे. गावातील राजकीय मंडळी आणि शिक्षकाचे काही जवळचे नातेवाईक पोलिस असल्याने पीडित महिलेवर दबाव टाकत ‘तुम्ही जर आमच्या पाहुण्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली’ तर तुम्हाला येथे राहून देणार नाही अशी धमकी देत संबंधित पीडित महिलेवर झालेल्या छेडछाडीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सध्या सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

(क्रमशः) 

घोड धरणात वाळूचोरी ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक