शिक्रापुरात एका युवकाकडून दोन हॉस्पिटलसह मॉल मध्ये चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एकाच युवकाने दोन हॉस्पिटल व एका मॉल मध्ये चोरी करुन लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सुर्या हॉस्पिटल येथे अंतरा डायग्नोस्टिक सेंटरचे सिटीस्कॅन टेक्नीशीयन सेंटर बंद करुन घरी गेलेले २३ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका युवकाने अंतरा डायग्नोस्टिक सेंटरचे लॉक तोडून आतमध्ये येऊन लॅपटॉप तसेच सिटीस्कॅन साठी वापरले जाणारे डोंगल तसेच रोख 50 हजार रुपये रक्कम घेऊन पोबारा केला. त्यानंतर काही वेळातच चाकण चौक येथील माऊलीनाथ हॉस्पिटलच्या मागील गेटने आतमध्ये येऊन 2 पेशंटचे महागडे मोबाईल घेऊन पसार झाला. याचवेळी त्याने माऊलीनाथ हॉस्पिटलच्या समोरील विशाल मेगा मार्केट मध्ये पाठीमागील शटरचे लॉक तोडून आतमध्ये ड्रावर मध्ये ठेवलेले 40 हजार रुपये काढून घेऊन पोबारा केला.

मात्र तीनही ठिकाणी घडलेला सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून चोरट्याने ओळख लपवण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले. घडलेल्याप्रकाराबाबत सूर्या हॉस्पिटलच्या अंतरा डायग्नोस्टिक सेंटरचे सिटीस्कॅन टेक्नीशीयन पवन राजेंद्र चौधरी (वय २८) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गोलवाडे ता. रावेर जि. जळगाव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.