कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.  महेंद्र लव सकट (वय २४) रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला आणि काही क्षणांतच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करुन आरोपी पसार झाला. विशेष म्हणजे, महिलेच्या हातात सोन्याऐवजी चक्क पितळेचे बिस्कीट ठेवून तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा शिक्रापुर पोलिसांनी CCTV आधारे छडा लावत बीड जिल्ह्यातून एका आरोपीला अटक केली […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची धाडसी कामगिरी; डायल ११२ ला कॉल अन मायलेकरांचा जीव वाचवला

शिक्रापुर (ओंकार भोरडे) “माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या…” डायल ११२ वर आलेल्या या आर्त मदतीच्या कॉलने शिक्रापुर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने धानोरे (ता.शिरुर) येथे धाव घेत हातात तलवार घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या या […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश; सात दुचाकी जप्त

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर (ता. शिरुर) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करत तब्बल ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाण्यातील एकूण ६ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अन्वये अंबादास दुक्कल जाट यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१२ डब्ल्युसी ३२१४) हि मोटारसायकल चोरीस […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या शारदा लॉजवर वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिसांनी येथील शारदा लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी लॉज चालक संतोष सीना पुजारी (वय ३७, रा. शिक्रापुर) याला अटक करण्यात आली आहे. शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करवून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुरच्या पश्चिम भागातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरुन जवळच असणाऱ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाजातील महिलेची छेड काढली. त्यानंतर सदर ठिकाणावरुन गावातील एका राजकीय पदाधिकारी महिलेने ११२ ला कॉल करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला. परंतु या शिक्षकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ येणार असल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. पुणे- नगर हायवेवर शिक्रापुर येथे वाहतूक शाखेचे कर्तव्य तत्परतेने काम करणारे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठांना सांगून सापळा रचून ५३ किलो गांजासह दोन स्कार्पिओ […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन ‘त्या ‘खुनाचा गुन्हा उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित ‘अज्ञात’ व्यक्तीच्या खुन प्रकरणी त्याच पोलिस स्टेशनमधील ‘खत्री’ नामक पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार अर्ज दिल्यानंतर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने निर्भिड व सडेतोडपणे सातत्याने बातम्यांच्या माधमातुन आवाज उठवला होता. या लढयाला अखेर यश आले असुन एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा केला असुन महिलेसह चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले […]

अधिक वाचा..

बेपत्ता बालिकेला शोधण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची रात्रभर धडपड

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा सोळुंके हि सात वर्षाची बालिका सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली मात्र त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी रात्रभर सदर बालिकेचा शोध घेतला असून अद्यापही सदर बालिकेचा शोध लागलेला नाही. शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील अपेक्षा सोळुंके (वय ७) हि तिच्या वडिलांसोबत खाऊ आणायला गेली. खाऊ घेतल्यानंतर तिच्या […]

अधिक वाचा..
sanaswadi-crime

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा फरार खंडणीखोर महेश जगताप जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख ) सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी घेतल्याबाबत गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेश जगतापला जेरबंद करण्यात अखेर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे. सणसवाडी […]

अधिक वाचा..