आता ३४२ गावांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार

महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (७ जुलै) महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात महामार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

या गावांचा समावेश 

सातारा-देवळाई (मनपा हद्दीत)

बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सहजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर (प्राधिकरणाकडे वर्ग झालेली)

प्राधिकरणाकडील तालुकानिहाय गावे 

छत्रपती संभाजीनगर: १४३

गंगापूर: ६७

फुलंब्री: १९

खुलताबाद: ४१

पैठण: ४३

झालर क्षेत्र: २६

एकूण: ३४२ गावे

आठ दिवसांत कारवाईचे अल्टीमेटम

अंदाजे *१५,००० अनधिकृत बांधकामे* गुंठेवारी अंतर्गत नियमित न झाल्यास, त्यावर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. जालना रोड, समृद्धी महामार्ग आणि झालर क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची मदत घेतली जाईल. आठ दिवसांत अतिक्रमणे नियमित न झाल्यास प्राधिकरण स्वतः कारवाई करणार आहे.