नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष चौकाकडे जाणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करणार का…?

शिरुर (तेजस फडके): “शिरूरच्या बाजारपेठेत अतिक्रमण करत बांधकाम सुरू,नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” असे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत शिरुर नगरपालिकेकडे सुरेश खांडरे यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत शैलेश किसनराव खांडरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” कडे लेखी खुलासा केला असुन सुभाष चौकातील त्या चौकामधील सर्वच बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गायरान अतिक्रमणाबाबत प्रशासन अलर्ट

मांडवगण फराटा (संपत कारकूड): जिल्हाधिकाऱ्यांकडून (दि. ४) नोव्हेंबर २०२२ रोजी गायरान अतिक्रमण काढण्याबाबत पारित झालेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व हालचाली संबंधित कार्यलयातून चालू झाल्या असून गटविकास अधिकारी ते ग्रामपंचात दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस प्रक्रिया चालू झाली काही ग्रामपंचात नवीन अतिक्रमांचा डेटा गोळा करीत असून २०११ नंतरच्या सर्व अतिक्रमणांचा या कारवाईत समावेश आहे. पुणे जिल्ह्यात शासकीय […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या कडेला धन दांडग्यांचे अतिक्रमण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम सुरु करत व्यावसायी गाळे बांधण्यास सुरवात केली असून गावातील काही नागरिकांनी याबाबत शासकीय कार्यालयात तक्रारी केल्या असताना देखील खुलेआम अतिक्रमण सुरुच असल्याने खळबळ उडाली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे न्हावरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रस्त्याचे कडेला अतिक्रमण […]

अधिक वाचा..

करडे येथील एस टी बस स्थानक कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण

आगार व्यवस्थापकांची तहसीलदार आणि पोलिसांकडे लेखी तक्रार शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकामधील कॅन्टीनच्या बाजूने स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण केल्याबाबत शिरुर आगार व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शिरुर आगाराचे व्यवस्थापक यांनी पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पर्यवेक्षकांनी बस स्थानकाची […]

अधिक वाचा..