शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांनी केले आहे.
या जनजागृती मोहिमेअंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालय, भुमिअभिलेख विभाग तसेच पंचायत समिती येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. लाचलुचपतविरोधी कायद्याबाबत माहिती देत “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रविण निबांळकर या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी भीती न बाळगता थेट अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि कायदेशीर कारवाई तत्काळ करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाचलुचपत विरोधी ब्युरो (ACB), पुणे
टोल फ्री क्रमांक: 1064
दूरध्वनी क्रमांक:
020-26132802, 020-26122134
ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
मोबाइल अॅप: www.acbmaharashtra.net
कार्यालयाचा पत्ता: ‘सी’ बॅरक, सेंट्रल बिल्डिंग, ससून हॉस्पिटल समोर, पुणे – 411001 या उपक्रमाद्वारे अॅन्टी करप्शन ब्युरोने नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, “लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही गुन्हेगार” हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला आहे.