रात्री चांगली झोप येण्यासाठी 7 ते 8 वाजता दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. फार जास्त जड काही न खाता हलकं काहीतरी खावं.
8 वाजतानंतर पूर्ण घरातील लाइट डिम ठेवा. प्रकाश कमी असेल तर झोप लवकर लागेल.
रात्रीचं जेवण झाल्यानंतर मेंदू एक्साइट होईल असं काही करू नका. जसे की, हॉरर सिनेमा बघणे किंवा ऑफिसचं काम करणे. त्याऐवजी मेंदू शांत होईल अशी कामं करा. जसे की, पुस्तक वाचा, पेटिंग करा.
झोपण्याआधी दिवसभर तुम्ही काय केलं ते लिहून काढा. दिवसातील 5 चांगल्या घटनांबाबत लिहा. यानंही तुम्हाला झोप येण्यास मदत मिळेल.
रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपतेवेळी शांत म्युझिक ऐकू शकता. यानं तुम्हाला चांगली झोप येईल.
इतरही काही टिप्स
रोज झोपेची वेळ एकच असणं फार महत्वाचं असतं. रोज जर झोपण्याची वेळ फिक्स असेल तर वेळ झाल्यावर तुम्हाला आपोआप झोप येईल.
रात्री झोपण्याआधी मद्यसेवन, कॅफीन जसे की, कॉफी, चहा पिऊ नये. यामुळे झोपमोड होते.
जर झोपण्याआधी एखादी हलकी एक्सरसाईज कराल तर यानं चांगली झोप येण्यास मदत मिळेल.
दिवसा जास्त झोप घेऊ नका. दिवसा एका तासांपेक्षा जास्त झोपाल तर रात्री झोप येणार नही.
(सोशल मीडियावरून साभार)