अपंगत्वावर मात करत आकाश खेंगटने मतदानाचा हक्क बजावला 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरा (अक्षय टेमगिरे): पारोडी येथे 28 वर्षीय अपंग युवक आकाश शांताराम खेंगट याने केले मतदान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पारोडी येथे अपंग युवक आकाश शांताराम खेंगट वय 28 वर्ष यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

शारीरिक अपंगत्व असूनही कोणतीही अडचण न मानता, कुटुंबीयांच्या सहकार्याने आकाश खेगट मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान प्रक्रिया पूर्ण करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि लोकशाहीप्रती असलेली निष्ठा उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारी होती.

अपंगत्व ही अडचण नसून इच्छाशक्ती महत्त्वाची असते,हे आकाश खेंगट यांच्या कृतीतून अधोरेखित झाले. त्यांच्या या मतदानाने इतर अपंग बांधवांनाही मतदानासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळाली आहे.पारोडी ग्रामस्थ व उपस्थित अधिकाऱ्यांनीही आकाश खेंगट च्या या कार्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या.