Shirur Police Station

शिरूर पोलिसांची अवैध दारु व्यवसायावर धडक मोहीम; तीन गुन्हे दाखल…

क्राईम

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात अवैध दारु व्यवसायाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र समोर येत असतानाच शिरूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारु विक्री आणि साठ्यावर सलग छापे टाकले. या कारवाईत तब्बल १ लाख २६ हजार ६९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारु व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. पहिल्या कारवाईत टाकळी हाजी हद्दीतील सावकवाडी परिसरातील ओढ्याच्या पाणलोट भागातील काटवनात छापा टाकण्यात आला. येथे सुरेश चोरे आणि संतोष मुंगळ (रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) हे गावठी हातभट्टीची दारु तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून हातभट्टीचे कच्चे रसायन, तयार दारु, केमिकलयुक्त साहित्य आणि इतर सामग्री असा १ लाख १३ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

याच दिवशी दुसरी कारवाई कवठे यमाई परिसरात करण्यात आली. येथील एका हॉटेलसमोर सुभाष पांडुरंग मुंगळ हा देशी-विदेशी दारुची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता विविध ब्रँडच्या विदेशी बिअर, किंगफिशर बिअर तसेच देशी दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तिसऱ्या कारवाईत मळण हद्दीतील आर. जी. रेस्टो परमिटरुम बार शेजारील ‘तिरंगा बिर्याणी’ हॉटेलवर छापा टाकण्यात आला. येथे सदाशिव रावजी घोडे हा देशी दारुचा अवैध साठा करुन विक्री करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी विविध कंपन्यांच्या देशी दारुच्या बाटल्या आणि मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी देखील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिनही कारवायांमध्ये शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असुन, आरोपींविरोधात पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान अवैध धंद्यांसाठी वापरले जाणारे साहित्य, रसायने आणि मोठ्या प्रमाणात दारु जप्त केली आहे. हि संपुर्ण मोहीम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष पथक तयार करुन हि कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, पोलीस हवालदार सुद्रिक, सांगळे, भवर तसेच पोलीस शिपाई गणेश गोसावी यांचा सहभाग होता.

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

दारू महागली म्हणून तरुण ब्रॅड बदलत लागले हातभट्टी दारूच्या नादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत