उपनिबंधक अरुण साकोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा उत्साहात

शिरूर तालुका

शिरूर (सुनिल जिते): वाघोली येथील कमल बाग सोसायटीमध्ये सहकार विभागातील उपनिबंधक अरुण साकोरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्नेहपूर्ण सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी मान्यवरांनी अरुण साकोरे यांच्या सुमारे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष शासकीय सेवेचा गौरव केला. त्यांनी १९९४ पासून सहकार विभागात विविध पदांवर कार्य करत तासगाव, कवठेमहांकाळ, राजगुरूनगर, आंबेगाव, शिरूर, मोवाड (जि. नागपूर), सासवड, दौंड, मुळशी तसेच पुणे शहर येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. शेवटी सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, मुख्यालय, पुणे येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले.

या प्रसंगी भाऊसाहेब साकोरे (सभापती ) मा. श्री. रामदास दाभाडे (नगरसेवक), तृप्ती भरणे (नगरसेविका), संतोष देशमुख (चेअरमन), प्रमोद पऱ्हाड , सतीश दादा थिटे, दत्ता मामा थिटे, अॅड. फक्कडराव साकोरे, तुकाराम बापू थिटे, रामशेठ साकोरे, दत्ता आप्पा साकोरे, अभिजात साकोरे, उमेश साकोरे, युवराज साकोरे, साहेबराव साकोरे, बाळासाहेब साकोरे, विलास नाना थिटे, दत्ता थिटे साहेब, बापूसाहेब थिटे, मधुकर शिंदे, राजूआण्णा साकोरे, नवनाथ साकोरे, दादाभाऊ डेरे गुरुजी, धोडिंबा साकोरे पाटील, निवृत्ती साकोरे, सूर्यकांत साकोरे, सूर्यकांत थिटे, सुभाष साकोरे तसेच केंदूर येथील सर्व पदाधिकारी, अलका पराड, बन्सी पऱ्हाड, संतोष थिटे, सनीदादा थिटे, सोमनाथ साकोरे, दत्ता शेठ साकोरे, आबा पराड, रविदादा गायकवाड, गणेश साकोरे, अमित साकोरे, ईश्वर साकोरे, रविदादा साकोरे, अमोल गायकवाड, गुलाबराव गायकवाड तसेच कमल बाग सोसायटी, वाघोली येथील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अरुण साकोरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. समारंभ आनंददायी वातावरणात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत