जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला.

जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा नागवडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पोलिस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण संरक्षण देत न्याय मिळवून द्यावा, असेही नागवडे यांनी म्हटले आहे.पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिच्या कुटुंबाच्या दुःखाचा किंवा परिस्थितीचा गैरवापर होणार नाही, याची समाजाने काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी आपण ठामपणे उभे असून, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत