शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील रहिवासी रमेश विठ्ठल गावडे यांचा १७ वर्षाचा एकुलता एक मुलगा कृष्णा हा हृदयाच्या आजाराने ग्रस्त असुन त्याची नारायना हॉस्पीटल बेंगलोर येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रुग्णाच्या वडिलांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असुन ते स्वतः मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. तसेच त्यांच्या मुत्रपिंडाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

त्यामुळे मुलासाठी दवाखान्याचा सहा लाख रुपये खर्च त्यांना पेलवणारा नसुन कवठे येमाईचे सामाजिक कार्यकर्ते सोपान वागदरे, नवनाथ इचके यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी सामजिक बांधिलकी जोपासत मदत करण्याचे आवाहन केले असुन मदतीसाठी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा.
रमेश विठ्ठल गावडे
मदतनिधीसाठी फोन पे नं – 8805734161
बँक तपशिल: कॅनरा बँक, शाखा- कवठे येमाई
Account no. 53302200021417
IFSC Code : CNRB0015330