ठाकरे गटाच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा भिकमांगो आंदोलन करुन निषेध

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुका उद्धव ठाकरे गट शिवसेना,युवासेना यांच्या वतीने भिकमांगो आंदोलन करण्यात आले. शिरुर ST स्टॅन्ड, बाजारपेठ येथे फिरुन कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भीक गोळा केली असुन हि जमा झालेली रक्कम पाटील यांना सोमवारी पोस्टामार्फत पाठवली जाणार आहे.

 

यावेळी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य कैलास भोसले, शहरप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार संतोष काळे, नगरसेवक मंगेश खांडरे, अविनाश घोगरे, खुशालबापू गाडे,युवासेनेचे स्वप्नील रेड्डी, शाखाप्रमुख आबासाहेब काळे, उपविभागप्रमुख आनंदराव ढोरजकर, उपविभागप्रमुख पंकज शेळके, विशाल फलके,सुनिल जठार, जालिंदर कुरंदळे, महेंद्र येवले, आकाश चौरे, महेश क्षिरसागर, पोपट ढवळे, विठ्ठल भालके, कमलेश चोपडा, सचिन खिलारे, राजेंद्र चोपडा, सिध्दांत चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.