शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील जयवंत भाकरे यांची माळी महासंघ उपाध्यक्ष किसान आघाडी महाराष्ट्र प्रदेश या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
माळी महासंघाचे प्रदेश सचिव चंद्रशेखरजी दरवडे, माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरूणराव तिखे, अरूणराव भुजबळ यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. त्यांनी सामाजीक स्तरावर केलेले कार्य व त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे.
माळी महासंघाच्या व वृध्दीकरीता त्यांची नियुक्ती महत्वाची असुन त्यांच्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीकरीता व समाजाचे उन्नतीकरीता उपयुक्त ठरेल. सावतामाळी पाणी पुरवठा योजनेचे संस्थापक अध्यक्ष, महात्मा ज्योतीबा फुले पतसंस्था उपाध्यक्ष, तर बळिराजा शेतकरी संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदे ते अनेक वर्षापासून यशस्वीरीत्या सांभाळत आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी सहभाग असतो. या निवडीमुळे बेट भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.