महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील गैव्यवहाराची महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करा; विजय वडेट्टीवार 

मुंबई: एस. टी कामगारांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे. यामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे.कर्जाचे व्याजदर ९ टक्के व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील बोलींना प्राधान्य देणारी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जाहीर

५ ते ७ जानेवारीला प्राथमिक फेरी मुंबई: मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर अंतिम फेरी १२ जानेवारीला दादरमध्ये होणार आहे. प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर […]

अधिक वाचा..

शिक्षणनगरी ब्रम्हपूरीत आजपासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

मुंबई: ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार […]

अधिक वाचा..
ded teacher

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज (इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील डेक्कन जिमखाना येथील नामांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता. बालपण देगा देवा असे आपण म्हणतो, पण गेलेला दिवस पुन्हा येत नाही, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे; कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते […]

अधिक वाचा..

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

कुठे चाललाय आमचा महाराष्ट्र 

मुंबई: सरकारच डोक ठिकाणावर आहे का? अस ठणकावून विचारणारे जहाल स्वातंत्र्य सेनानी ‘केसरी ‘चे संपादक, सार्वजनिक गणपति, नवरात्र उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी जागृती करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट ला साजरी केली. गरिबांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे, आपल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून इंग्रजांनाही सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती  ३ ऑगस्टला […]

अधिक वाचा..

संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना […]

अधिक वाचा..
rahata-marriage

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

अहमदनगर: स्मशानभूमी म्हंटले की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र असते. पण, राहाता शहरातील स्मशानभूमीत विवाह सोहळा पार पडला. सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह […]

अधिक वाचा..