शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते विजय सावंत, राहुल जगताप यांच्यासह अनेक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनतर्फे देण्यात येणारा ‘लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर विजय सावंत […]

अधिक वाचा..

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा […]

अधिक वाचा..

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे की नाही, याबाबत सुरू असलेल्या संभ्रमाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. २०१८ मध्ये करण्यात आलेल्या कायद्यातील दुरुस्तीमुळे नगराध्यक्षांचे वित्तीय नियंत्रणाशी संबंधित अधिकार वगळण्यात आल्याने नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांसोबत नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले […]

अधिक वाचा..

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी […]

अधिक वाचा..

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातच तालुक्यात विविध भागांत बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शेती पंपासाठी एका आठवड्यात दिवसा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत […]

अधिक वाचा..

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २४ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (५ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे उघडकीस आली. निकिता ऋषीकेश वाकळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. निकिताचा विवाह एप्रिल महिन्यात ऋषीकेश वाकळे याच्यासोबत झाला होता. […]

अधिक वाचा..

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांची भेट घेतली होती. यावेळी प्राध्यापकांच्या कार्यालयातील भिंतीवर […]

अधिक वाचा..

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सुमारे २.५ कोटी रुपये किमतीच्या लक्झरी SUVने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात २० वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम प्रजापती (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सुमारे १०.१५ वाजता शुभम दुचाकीवरून […]

अधिक वाचा..

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (५ सप्टेंबर) मृत्यू झाला. श्याम रोकडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच श्याम यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. श्याम […]

अधिक वाचा..