शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील शिक्षकांचा पेन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीने हा उपक्रम राबविला. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार देऊन त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य […]

अधिक वाचा..

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी उत्सवाला गालबोट लागले आहे. ऐरोलीत मानवी मनोरा रचताना तोल जाऊन पडलेल्या ३४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. तर मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडीसाठी बांधलेला खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत १६८ गोविंदा […]

अधिक वाचा..

आई-बहीण, पत्नीबाबत अश्लील शिवीगाळ अन् जीभ कापण्याची धमकी

आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशांत आंबी नामक व्यक्तीशी फोनवर बोलताना आमदार गायकवाड यांनी आई, बहीण आणि पत्नीबाबत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका महिलेने कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहकाच्या खिशातील तिकिटाच्या जमा रकमेतील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने लुटणे, बसची समोरील काच दगडाने फोडणे आणि बसची चावी घेऊन पसार होणे, असा गंभीर प्रकार करणाऱ्या चौघांच्या शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध (DB) पथकाने अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या असुन आरोपींच्या […]

अधिक वाचा..

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा खांब कोसळून बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटी, चिकूवाडी, मार्वे रोड येथे घडली. मिळालेल्या […]

अधिक वाचा..

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर डीजेचे साउंड बॉक्स आणि लोखंडी सांगाडा उतरवताना तो अचानक कोसळून एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. जुन्या सांगवीतील गल्ली क्रमांक २ मध्ये ही घटना […]

अधिक वाचा..

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक पुढे आले नाहीत. अखेर अवसरी खुर्द ग्रामपंचायतीने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली आणि सन्मानाने अखेरचा निरोप दिला. विशेष म्हणजे, हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांच्या दशक्रियाविधीचीही व्यवस्था ग्रामस्थांनी केली. रामदास शिंदे हे शुक्रवारी (ता. ४) सकाळी […]

अधिक वाचा..

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक आणि अवेळी खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अघोषित भारनियमनाची गंभीर दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. कृषीपंपांचा वीजपुरवठा कमी दाबाने, अचानक आणि अवेळी खंडित का केला जात आहे, असा सवाल करत […]

अधिक वाचा..

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यावरील सुमारे १०० फूट उंच बुरुजावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच […]

अधिक वाचा..

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे, असे आपण नेहमी ऐकतो. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहिल्यावर या तीनही गोष्टींवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. सामान्य नागरिक आणि राजकीय नेता यांच्यासाठी कायद्याचे मापदंड वेगवेगळे आहेत का, असा सवाल आता जनतेच्या मनात निर्माण होत आहे. युट्यूबच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर […]

अधिक वाचा..