कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्या, तरी नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून, ई-श्रम पोर्टलवर सुमारे १.८३ कोटी कामगारांची नोंदणी झाली आहे. यात महिलांचे प्रमाण […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व सविस्तर चर्चा पार पडली असून, सर्व निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली. गांधी भवन येथे झालेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश महाधू फटांगडे (वय अंदाजे ३८ वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश फटांगडे हे शर्यतीदरम्यान गाडा अंगावर […]

अधिक वाचा..

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे: केव्हा […]

अधिक वाचा..

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी क्र. २१६२ संदर्भात […]

अधिक वाचा..

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठी न येणाऱ्या अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार […]

अधिक वाचा..

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे वक्तव्य काँग्रेसकडून करण्यात आल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सोमवारी ठाणे येथे झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, अशा प्रकारची विधाने निंदनीय असून देशाच्या प्रतिमेला धक्का […]

अधिक वाचा..

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत लवांडे यांना थेट इशारा दिला आहे. “महाराष्ट्र ही साधू-संतांची, वारकऱ्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. या पवित्र भूमीत वारकरी संप्रदायाला […]

अधिक वाचा..

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा परिसरातील आश्रमशाळेत सेंट्रिंगचे काम सुरू असताना मोबाईलवर व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच मध्यस्थीला आलेल्या महिलेवर मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

द्रुतगती चलन भरूनही मोजण्या रखडल्या; शिरूरमधील शेतकऱ्यांचा संताप, बावनकुळे यांना सवाल

शिरूर (अरुणकुमार मोटे): द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजण्या होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित केला आहे. नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांत […]

अधिक वाचा..