सचिन तेंडुलकर यांची एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण

  मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन यांच्या पत्नी  अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) देखील उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत […]

अधिक वाचा..

लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केले. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा […]

अधिक वाचा..

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट..

मुंबई: भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग […]

अधिक वाचा..

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार

यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार मुंबई: दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

निमोणे गावात ग्रामपंचायतीचा ठराव असतानाही दारुधंद्याचा सुळसुळाट…?

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निमोणे गावात सध्या हातभट्टी आणि विदेशी दारु विक्रीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव करुनही त्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीने यापुर्वी दारुबंदीचा ठराव घेत संबंधित विक्रेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांना केराची […]

अधिक वाचा..
ajit pawar

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

शिरुर (तेजस फडके) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. शिरूर तालुक्यातही त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत असून, शिरूर तालुक्याशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या अनेक आठवणी पुन्हा उजाळल्या जात आहेत. अजित पवार यांचे शिरूर तालुक्यावर विशेष प्रेम होते. विकासकामे, पायाभूत सुविधा, उद्योग, पाणीपुरवठा, शेती आणि विविध प्रशासकीय प्रश्नांबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण अभिवादन

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान त्यांनी लंडन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केले. लंडनमधील किंग हेन्रीज रोड, कॅम्डन येथे असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ या ऐतिहासिक स्थळी डॉ. गोऱ्हे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखीचा धुमाकूळ; पिठफेक ते खुर्ची फेकण्यापर्यंत वादाचा कळस

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात घरातील वातावरण अक्षरशः तापले आहे. या आठवड्यात एकूण नऊ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले असून सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार यांच्यावर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. घराची सूत्रे राखीकडे; सदस्यांवर दबाव या सगळ्यात ड्रामा क्वीन म्हणून […]

अधिक वाचा..

आईच्या कॅन्सरशी लढ्यात अभिनेत्री पायल जाधव खंबीरपणे उभी; भावनिक पोस्टने चाहत्यांना केला हेलावून

मुंबई: झगमगत्या मनोरंजनविश्वामागे कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा दडलेले असतात. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी मराठी अभिनेत्री पायल जाधव हिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या आईने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्याची भावनिक आठवण तिने आईच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली. पायल जाधवच्या आईने कॅन्सरशी कठीण झुंज देत अखेर विजय मिळवला. त्या काळात माय-लेकींसाठीचा प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता. […]

अधिक वाचा..