नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर 

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास देत असे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील गुडघेदुखीची समस्या सतावते. गुडघेदुखी, गुडघ्यांना सूज येणे यामुळे बसताना, उठताना त्रास होतो सोबतच, काहीवेळा चालणे – फिरणेही अवघड होऊन जाते. गुडघेदुखीची ही समस्या वाढत्या वयामुळे, सांध्यांवरचा ताण किंवा […]

अधिक वाचा..

दादांच्या आवाजातील बनावट एआय क्लिप्स प्रकरण; जबाबदारांवर कडक कारवाई करणार; सुनील तटकरे 

मुंबई: आदरणीय दादांच्या आवाजात खोटी व दिशाभूल करणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, संबंधितांनी अशा एआय-निर्मित (AI-generated) बनावट क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र ही भेट केवळ राजकीय नव्हती, तर कलारसिकतेचा सुंदर संगम ठरली. नंदनवन बंगल्यात लावण्यात आलेली मुंबईतील हेरिटेज वास्तूंची दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहताना राज ठाकरे अक्षरशः भारावून गेले. […]

अधिक वाचा..

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे. मुंबईत दररोज लाखो पर्यटक आणि व्यावसायिक ये-जा करत असतात. शहरात प्रवेश करतानाच मुंबईची वेगळी आणि आकर्षक ओळख निर्माण व्हावी, तसेच जागतिक […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचा उपक्रम

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे स्व. अरुण सरनाईक यांच्यावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी; जयकुमार रावल

मुंबई: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी येणाऱ्या काळात आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शेतकऱ्यांना देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीच्या आधारे शेतमाल विक्रीबाबत अचूक आकलन होऊन स्पर्धात्मक दरात […]

अधिक वाचा..

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या; शिवेंद्रसिंहराजे भोंसले           

मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस […]

अधिक वाचा..

चौलमध्ये आशापुरी–हिंगुळजा मंदिर वाद पेटला; वनजमिनीवरील अतिक्रमणाचा आरोप

रायगड: रायगड जिल्ह्यातील चौल येथे आशापुरी देवी व हिंगुळजा देवी मंदिर परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व मंदिराच्या नामांतराचा आरोप स्थानिक रामवंशी क्षत्रिय समाजाने केला आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नेमका वाद काय? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशापुरी देवी व हिंगुळजा देवी या पारंपरिक दैवतांचे […]

अधिक वाचा..