आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय

धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

भाजपा उपऱ्यांचा पक्ष; आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपानी मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी  कल्याण डोंबिवली: कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. […]

अधिक वाचा..

सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेचे घवघवीत यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत सासवड येथे दि. २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय, सविंदणे येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.या स्पर्धेत १७ वर्ष वयोगट मुली कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, १४ वर्ष वयोगट […]

अधिक वाचा..
babanrao-lawande

रांजणगाव गणपती येथील बबनराव लवांडे यांचे निधन

शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

आश्वासनांची पुनरावृत्ती! रस्ते दुरुस्ती अर्धवट, शिरूर बांधकाम उपविभागाविरोधात नागरिकांचा संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत शिरूर – मलठण महामार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असून प्रत्यक्ष कामे अर्धवट व शास्त्रीय पद्धतीने व दर्जेदार होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब झालेल्या MPM रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, मागणीप्रमाणे कारपेटचे काम करण्यात येईल तसेच आनंद सोसायटी ते […]

अधिक वाचा..

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल; अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा मुंबई: राज्यातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह दूरदर्शी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र आपली महत्त्वपूर्ण भूमिका यशस्वीपणे बजावेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्ष २०२६ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला नवीन वर्षातील पहिला दिवस कसा असेल 

मेष: दिवस ठिक आहे पण तुमच्या मनात नसलेली कामेही करावी लागतील. ही कामे इतरांसाठी गैरसोयीची असू शकतात. घरातील काही सदस्य किंवा मुलांच्या वर्तणुकीमुळे तुम्ही दुःखी व्हाल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कायदेशीर वादात यश मिळेल. प्रवासाचा योग असून प्रवास लाभदायक आहे वृषभ: आजचा दिवस उत्तम असून करिअर संदर्भात खुषखबर मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ‘तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो’, असे म्हणत गजाने केला हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): जागा विक्रीस नकार दिल्याचा राग मनात धरुन एका ६० वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे. या प्रकरणी संजय बाळासाहेब बेंद्रे याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नारायण बेंद्रे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. आंबळे) यांनी याबाबत फिर्याद […]

अधिक वाचा..