खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार 

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे.समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील पदाधिका-यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर आजाद समाज पार्टीच्या पदाधिका-यांनी प्रदेश स्तरावर हर्षवर्धन सपकाळ यांची तर मुंबई अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांची […]

अधिक वाचा..

मलठणमध्ये विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास झाल्याने वीजपुरवठा खंडित

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन मुंबई: उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा […]

अधिक वाचा..

मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा

निर्णयास विलंब होत असल्याने नाराजी  मुंबई: माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असून हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.या पक्षाकडून मुंबईतून आठ तसेच […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत प्लॉट माफियांचा पर्दाफाश; बापूसाहेब शिंदेंच्या एकाच फोनने पीडिताला १५ लाखांची परतफेड 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती परिसरात प्लॉट देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचे घर घेण्याच्या स्वप्नासाठी कष्ट करणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील तरुण कामगाराची एका प्लॉट मालकाकडुन फसवणुक करण्यात आली. मात्र गोरगरिबांचे खरे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासुन वाचले असुन, […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस व ‘वंचित’ची आघाडी; वंचित ६२ जागा लढवणार

राज्यातील राजकारणात आजपासून नव्या पर्वाला सुरुवात, हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस […]

अधिक वाचा..

देशाला आज काँग्रेस विचाराची नितांत गरज; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची शेळी-बोकड चोरीप्रकरणी धडक कारवाई; दोन जणांना अटक करत १.१५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये शेळी आणि बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभुमीवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करत अवघ्या ७२ तासांत दोन सराईत चोरट्यांना अटक करुन मोठी कामगिरी बजावली आहे. बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे परीसरात काहीजण दुचाकीवर […]

अधिक वाचा..