शिरूरमध्ये श्री शिवमहापुराण कथेला लाखोंची गर्दी; उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ठरला ऐतिहासिक

शिरूर (अरुणकुमार मोटे): धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. […]

अधिक वाचा..

इराणमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; खामेनेई यांच्या निधनानंतर अलीरेझा अराफी अंतरिम सर्वोच्च नेते

तेहरान: पश्चिम आशियात सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठे राजकीय परिवर्तन घडले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे दीर्घकाळ सर्वोच्च नेते राहिलेले अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.या घडामोडीनंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर राजकीय उलथापालथ शनिवारी अमेरिकन आणि […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये तिहेरी वाइल्ड कार्ड एन्ट्री? घरात रंगणार नवा ड्रामा!

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला आता चांगलीच रंगत आली असून लवकरच ५० दिवसांचा टप्पा पूर्ण होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात नेहमीप्रमाणे रविवारी नव्हे, तर शनिवारीच एलिमिनेशन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्यात राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता हे चार जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले […]

अधिक वाचा..

‘मिशन तन्वी’ला नवी कलाटणी! प्रियाच्या रक्तगटाच्या रिपोर्ट्समुळे उघड होणार मोठं सत्य?

मुंबई: ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनने हाती घेतलेल्या ‘मिशन तन्वी’मुळे कथानकाला जबरदस्त वेग आला आहे. नागराजने तुरुंगात जाताना दिलेल्या हिंटनंतर दोघांनाही प्रियाच खरंच प्रतिमाची मुलगी आहे का, याबाबत संशय निर्माण झाला आहे. आता याच संशयाचा छडा लावण्यासाठी ते पुरावे गोळा करताना दिसत आहेत. होळीच्या सणात उलगडला संशयाचा धागा सुभेदारांच्या घरी होळीचा उत्सव […]

अधिक वाचा..

लग्नानंतर होईलच प्रेम! लालबागच्या राजाच्या साक्षीने जीवा-नंदिनी, पार्थ-काव्याची दणक्यात वरात!

मुंबई: स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या या दोन्ही जोडप्यांनी प्रेम जुळल्यानंतर पुन्हा एकदा स्वखुशीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.या खास प्रसंगानिमित्त दोन्ही जोडप्यांची वरात थेट मुंबईच्या रस्त्यांवरून दणक्यात निघाली. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेत या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात रंगली वरात […]

अधिक वाचा..

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

पुणे: गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात साई केअर हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांसह पाच जणांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे […]

अधिक वाचा..

मर्डर मिस्ट्रीने सजलेला ‘तलास’; गौतमी पाटीलच्या धम्माल गाण्याची रंगतदार एन्ट्री

मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांची परंपरा कायम राखत रहस्य आणि रोमांचाचा संगम घडवणारा ‘तलास’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शीर्षकावरून कथानकाचा अंदाज न लागणारा हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो. निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी कथा, पटकथा आणि […]

अधिक वाचा..

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोली: अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत 28 लाख रुपये किंमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रोन, मोटार आणि मोबाईल असा एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किशन नंदकिशोर लधड (वय 35, रा. धानोरी) आणि हनुमान रूपाराम चौधरी (वय 33, रा. वडगाव […]

अधिक वाचा..

नांदेड परिक्षेत्रात ‘ऑल आऊट ऑपरेशन’चा धडाका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदपूर, उमरी, मुदखेड, कळमनुरी, किनगाव आणि गंगाखेड या भागांमध्ये टाकलेल्या धाडीत अवैध वाळू उपसा व जुगार अड्ड्यांवर कारवाई करत सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने नागरिकांना पुराव्यानिशी तक्रारी करण्याचे […]

अधिक वाचा..

बारामतीत स्ट्रॉबेरीचा गोड प्रयोग! निंबुतच्या दीपक जगताप यांचा १० गुंठ्यात लाखोंचा नफा

बारामती: बारामती तालुका म्हटले की उसाची हिरवीगार शेती डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र बारामती तालुक्यातील निंबुत गावात एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक चौकटी मोडत थंड प्रदेशातील स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत नवा आदर्श निर्माण केला आहे. दीपक जगताप यांनी विज्ञानाधारित नियोजन, हवामान व्यवस्थापन आणि अचूक निरीक्षण यांच्या जोरावर हा प्रयोग फळाला आणला. परंपरेपलीकडचा विचार, प्रयोगशीलतेची वाट दीपक जगताप […]

अधिक वाचा..