नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, […]

अधिक वाचा..

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे काम हे बैठ्या स्वरूपाचे असते. शेतात किंवा कष्टाचे काम करण्यापेक्षा बैठे काम बरे वाटत असले तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संपत गणपत काळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरुन संजय राजाराम काळे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस, NSUI आणि समविचारी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. टिळक भवन […]

अधिक वाचा..

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत […]

अधिक वाचा..

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकभवन, मुंबई येथे आयोजित या सोहळ्यात कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांचा […]

अधिक वाचा..

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरातील मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यामध्ये आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले. अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच आपल्या मित्राचा गळा दाबून खून केल्याचे, तर आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे […]

अधिक वाचा..

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरात चासकमान पाटबंधारे विभागाकडून कालव्याच्या पाटाचे सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम कालव्याच्या हेडऐवजी टेलपासून सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post […]

अधिक वाचा..

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का […]

अधिक वाचा..