पशुसंवर्धन विभागाच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्न; शंभरहुन अधिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘मॅट’ मध्ये धाव 

मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या नियतकालिक बदली प्रक्रियेविरोधात राज्यातील १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) याचिका दाखल केल्या आहेत. हि बदली प्रक्रिया मनमानी, अपारदर्शक, भेदभावपूर्ण आणि समान संधीच्या तत्त्वाला बाधा आणणारी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या बदली प्रक्रियेसाठी राबविण्यात आलेली समुपदेशन पद्धत, […]

अधिक वाचा..

वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांची वडेट्टीवारांकडून भेट; हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली. वन विभागाच्या वतीने मृतकाच्या वारसांना देण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवड पूर्णपणे वैध; नोटीसमध्ये तथ्य नाही; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसवजा पत्रात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तटकरे म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नियमानुसार बोलावण्यात आली होती. बैठकीतील सर्व कामकाज आणि अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांचे पालन करूनच […]

अधिक वाचा..

शासकीय कर्जाच्या आमिषाने शिरूरमध्ये १०० हून अधिक नागरिकांची लाखोंची कथित फसवणूक

महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष शिरूर (अरुणकुमार मोटे): महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत शिरूर परिसरातील १०० हून अधिक महिला-पुरुषांची लाखो रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि पीडितांची […]

अधिक वाचा..

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय,” अशी बोचरी टीका करत त्यांनी उद्धव […]

अधिक वाचा..

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयात […]

अधिक वाचा..

राजर्षी शाहू जयंती निबंध-काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; पत्रकार राजन पारकर यांना प्रथम क्रमांक

मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या निबंध व काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेला राज्यभरातील शाहूप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निबंध स्पर्धेत पत्रकार राजन पारकर (मुंबई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर काव्य स्पर्धेत अमित माने (कल्याण) यांना प्रथम क्रमांक आणि अमरसिंह जगदाळे (कोल्हापूर) यांना […]

अधिक वाचा..

स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा शासकीय जयंती यादीत समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत सूचीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, […]

अधिक वाचा..

राम मंदिर देणगीप्रकरणी RSS ने संबंधितांना संघातून काढावे; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

मराठवाडा आढावा बैठकीत सरकारवरही जोरदार टीका; “दुबार पेरणी, दुष्काळ आणि बोगस बियाण्यांप्रमाणे बोगस सरकार” असा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील देणगीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांना संघातून निष्कासित करण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावी, […]

अधिक वाचा..

अमृत भारत योजनेतून बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट; सुनेत्रा अजित पवार यांचे मोदी-वैष्णव यांना आभार

मुंबई: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी […]

अधिक वाचा..