amol-kolhe-win

शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. हा विजय सुकर होण्यासाठी शरद पवारांविषयी लोकांच्या मनात असलेली सहानुभुती व प्रेम हे कारणीभुत ठरले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात ” शरद पवार पँटर्न ” चालला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शिरुर मतदार संघात करण्यात […]

अधिक वाचा..
amol-kolhe

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे विजयी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 57 हजार 467 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले. नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच; अमोल कोल्हे म्हणाले…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तेराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ५५,९४१ मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदारसंघातील निकालाचे आकडे आज समोर येत असून यामध्ये अभिनेता नेत्यावर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५० हजारहून अधिक मतांनी आघाडी […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे ): लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरुवात झाली असून पहिले कल हाती येत आहेत. यामध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले […]

अधिक वाचा..
pune-police-legs

Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शिरूर तालुक्यातील एका युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात […]

अधिक वाचा..
dead

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिक्रापूरः हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत एस टी बसच्या अपघाताला एक दिवस हित नाही तोच दुसरा भीषण अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिक्रापूर: मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धामारी येथील पाबळ-शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चालले […]

अधिक वाचा..

Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरुर (अर्जुन शेळके) पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nagar Highway) सरदवाडी (ता.शिरुर) येथे शनिवार दि 1 जुन 2024 रोजी पहाटे 3:38 च्या दरम्यान रात्री भरधाव असणाऱ्या मालवाहू कंटेनर ट्रेलरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने रस्ता दुभाजक ओलांडून थेट सलूनच्या दुकानाला धडक दिली. पहाटेच्या वेळी रहादारी कमी असल्यामुळे एवढा मोठा अपघात होऊनही या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या चारचाकी गाडील अज्ञात कार चालकाने त्यांच्या समोरुन भरधाव वेगाने कार आडवी मारत घातपात घडवण्याचा प्रयत्न केला. हि घटना बुधवार (दि 29) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास तळेगाव-न्हावरे रोडवरील तोडकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी भोरडे यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या […]

अधिक वाचा..