शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तेराव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ५५,९४१ मतांची आघाडी मिळाली आहे. अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचे यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो बघतोच, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारले होते. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हे यांनी जोरदार खिंड लढवत अजित पवार यांना जशाच तसे उत्तर देत हे चॅलेंज स्विकारलं होते.
अमोल कोल्हे यांनी मोठी आघाडी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बातचीत केली. त्यावेळी बोलताना हा माझा विजय नाही, हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हे म्हणाले, ‘अजित पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व शिलेदारांनी ज्या हिरहिरीने किल्ला लढवला, त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. त्याचे कौतुक आहे. पराभव कुणाचा यापेक्षा निष्ठा, प्रमाणिकपणा आणि स्वाभिमान यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय आहे.’
‘स्वत: लोकसभा निवडणूक लढवत असताना सहा सहा मतदारसंघात जाऊन सभा करणं, थोडं रिस्की असल्याचे अनेक नेत्यानं सांगितलं होतं. पण माझा प्रमाणिक हेतू होता. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांनी संघर्ष उभा करत होते. त्यामध्ये माझा खारीचा वाटा व्हावा म्हणून मदत करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची कामगिरी पाहून उर अभिमानाने भरुन येतो. शरद पवार यांच्याविषयी आदर आणखी वाढला आहे. सगळं काही गमावलं असं वाटत असताना शरद पवार ज्या हिमतीने उभे राहिले, हे संघर्षाच मोठे उदाहरण आहे. हे सर्व महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे,’ असे अमोल कोल्हे म्हणाले.
शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे यांची जोरदार मुसंडी; पाहा आकडेवारी…
शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…
कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…
Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…
शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी
शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…
Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे
Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे