Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अर्जुन शेळके) पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nagar Highway) सरदवाडी (ता.शिरुर) येथे शनिवार दि 1 जुन 2024 रोजी पहाटे 3:38 च्या दरम्यान रात्री भरधाव असणाऱ्या मालवाहू कंटेनर ट्रेलरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने रस्ता दुभाजक ओलांडून थेट सलूनच्या दुकानाला धडक दिली. पहाटेच्या वेळी रहादारी कमी असल्यामुळे एवढा मोठा अपघात होऊनही या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MH 12 MV 6939 हा मालवाहू कंटेनर पोकलॅन मशीन घेऊन पुण्याकडुन-अहमदनगरकडे जात असताना सरदवाडीजवळ आल्यानंतर कंटेनर ट्रेलर चालविणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरने थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानाला धडक दिली. सदरचा परिसर हा लोकवस्तीचा असुन पहाटेची वेळ असल्यामुळे सलुनचे दुकान बंद होते. इतर वेळेस वर्दळीचे असलेल्या या ठिकाणी पहाटेच्या वेळेस कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

 

या अपघातामध्ये सलुन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन इमारतीचेही नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की कंटेनर इमारतीला धडकल्यानंतर मोठयाने आवाज झाला. तसेच इमारतीमधील लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असता. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे पहाटेच्या वेळी हा अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. हि सगळी घटना जवळच असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.

 

या घटनेमुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहनचालकाकडुन नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शिरुर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबाबत अजुन कसलीही तक्रार दाखल झालेली नाही.

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप