pune-police-legs

Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…

क्राईम मुख्य बातम्या

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शिरूर तालुक्यातील एका युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. यावेळी पोलिसांनी वाहन चालकास अडवलं आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. दरम्यान, यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने युवकास चक्क पाय दाबण्यास सांगितले, अशी प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस अधिकारी खुर्ची बसल्याचे दिसत असून एक युवक त्याचे पाय चेपताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार नक्की यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

शिरुर; सरदवाडी येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…