संगमनेर निकालावर कायदेशीर घोंगडी! अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

SLP फेटाळली; शपथपत्रातील माहिती लपविल्याच्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा मुंबई: संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग […]

अधिक वाचा..

‘ॲक्शन मोड’मध्ये सुनेत्रा पवार; पहाटेच जिल्हा रुग्णालयात धडक, बीडच्या विकासाला नवी गती

बीड : उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात विकासकामांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यांच्या या कार्यशैलीमुळे “बीडच्या विकासाचा वेग कायम राहणार” […]

अधिक वाचा..

‘माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार; महिला सक्षमीकरणाला चालना असल्याचा दावा

योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका होण्यास आणि महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे समर्थकांचे मत मुंबई : राज्य सरकारच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचा दावा योजनेच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी या योजनेतून मिळालेल्या मदतीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, घरगुती गरजा भागवण्यासाठी, आरोग्यावरील खर्चासाठी तसेच स्वावलंबनाच्या दिशेने पावले उचलण्यासाठी […]

अधिक वाचा..

उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील सेवा ठप्प? सिटीस्कॅन-एक्सरेसाठी रुग्णांना खासगी केंद्रांकडे पाठवल्याचा आरोप

उल्हासनगर : उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयात सिटीस्कॅन, एक्सरे आणि इतर काही महत्त्वाच्या तपासण्यांच्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सिटीस्कॅन व एक्सरे मशीन बंद असल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांना जवळील टाऊन हॉल परिसरातील केंद्रांमध्ये तपासणीसाठी […]

अधिक वाचा..

‘पुणे–नाशिक रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; सत्यजीत तांबेंचे जनआंदोलनाचे रणशिंग’

मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट (क्रांतीदिन) रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावरील विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्र सरकारकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले […]

अधिक वाचा..

अमरावतीच्या पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लक्ष; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

मुंबई: अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने मदत व बचावकार्याला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या […]

अधिक वाचा..

शेजाऱ्यानेच रचला घरफोडीचा डाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला पर्दाफाश

शिक्रापूर (ओमकार भोरडे ): शेजारधर्माच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. दशक्रिया विधीसाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जाणार असल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच सराईत चोराला पुरविल्याने बंद घरावर डल्ला मारून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले मात्र शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

राज हॉटेलशेजारील ‘शिवराज मोबाईल रिपेअरिंग’ दुकानाचे पत्रे उचकटून चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिक्रापूर येथील राज हॉटेलशेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात […]

अधिक वाचा..

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करणारा राज्य सरकारचा नवीन जीआर अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो. पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक […]

अधिक वाचा..